सौराष्ट्राचा पहिला डाव ५ बाद ३९५ धावांवर घोषीत
सौराष्ट्राचा पहिला डाव ५ बाद ३९५ धावांवर घोषीत
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - येथे महाराष्ट्र विरुद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात सौराष्ट्राने पहिला डाव ५ बाद ३९५ धावांवर घोषीत केला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा महाराष्ट्राने बिनबाद ३१ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ (९) तर आर्शिन कुलकर्णी (२२) धावांवर खेळत होते. सामन्याचे अखेरचे दोन तास शिल्लक राहिले असल्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुणांवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.



तत्पूर्वी हार्विक देसाई (१३२) व जय गोहिल (११५) यांनी आपापली शतके झळकावत सौराष्ट्राच्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. ्रअर्पित वासवदा याने ७३ धावांची खेळी केली. येथील अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी हार्विक देसाई व जय गोहिल यांनी सकाळच्या सत्रात आपली मॅरेथॉन खेळी कायम ठेवली. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरी याने दोन तर प्रदीप दाढे, विकी ओस्तवाल, जलज सक्सेना यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला. 
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group