नाशिक : सौराष्ट्र १ बाद १६५ धावा; सामना औपचारिक स्थितीत
नाशिक : सौराष्ट्र १ बाद १६५ धावा; सामना औपचारिक स्थितीत
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तिसर्‍या दिवसाच्या खेळात सौराष्ट्राच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दाद न देता आपली मॅरेथॉन खेळी कायम ठेवल्याने तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्राने १ बाद १६५ धावा केल्या होत्या. दरम्यान तिसर्‍या दिवसाचाही निम्मा खेळ ढगाळ हवामान व ओलसर मैदानामुळे वाया गेला. यामुळे आता सामन्याला केवळ औपचारिक स्थिती प्राप्त झाली आहे.



येथील अनंत कान्हेरे मैदानावर खेळविला जात असलेला महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र या रणजी करंडकाच्या साखळी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी केवळ पावणे तीन तासांचा खेळ होऊ शकला. मैदानी पंचांनी तीन वेळेस मैदानाचे निरीक्षण केल्यानंतर सामना दुपारी तीन वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला. सौराष्ट्राच्या फलंदाजांनी १ बाद ६१ धावसंख्येवरून खेळण्यास सुरूवात केली. हार्विक देसाई आणि जय घोईल यांनी सुरूवातीला खेळपट्टीवर आपला जम उत्तमरित्या बसविला. 

त्यानंतर महाराष्ट्राच्या जलदगती गोलंदाजांना कोणतीही दाद दिली नाही. हार्विक देसाई (नाबाद ७०)आणि जय घोईल(नाबाद ७४) यांनी दुसर्‍या विकेटसाठी अभिद्य अशी १४० धावांची भागीदारी करीत सौराष्ट्राला उत्तम स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हार्विक देसाई आणि जय घोईल हे नाबाद होते. सौराष्ट्राने १ बाद १६५ धावा केल्या होत्या.

दरम्यान,तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सामन्याचा निकालदृष्टीपथात न आल्याने आणि चौथा दिवसाच्या खेळाला केवळ औपचारिकता प्राप्त झाली आहे. मात्र गोलंदाजांनी काही कमाल केली तरच सामन्याचा निकाल वेगळा लागू शकतो.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group