नाशिक शहरात तीन घरफोड्यांमध्ये 26 तोळ्यांच्या दागिन्यांसह 33 लाखांची रोकड लंपास
नाशिक शहरात तीन घरफोड्यांमध्ये 26 तोळ्यांच्या दागिन्यांसह 33 लाखांची रोकड लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोड्यांच्या घटनांमध्ये 26 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा 33 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



घरफोडीचा पहिला प्रकार सिडको येथे घडला. फिर्यादी वंदना दादासाहेब अहिरे (रा. सिद्धिविनायक कॉलनी, खांडे मळा, सिडको) या दि. 22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान मुलगी व जावयासोबत देवदर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मागील दरवाजाचे लॅचलॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या कपाटातून आठ लाख रुपये किमतीचे आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, तीन तोळे वजनाचा तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, अडीच लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन, तीन लाख रुपये किमतीच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, चार लाख रुपये किमतीचे चांदीचे कडे, तांबे, ग्लास, 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड, 50 हजार रुपये किमतीचा आयफोन, 50 हजार रुपये किमतीचे 30 नग मनगटी घड्याळ असा एकूण 23 लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडोळकर करीत आहेत.



घरफोडीचा दुसरा प्रकार राणेनगर येथे घडला. फिर्यादी अपर्णा पंकज वाकतकर (रा. अपूर्वाई बंगला, राणेनगर, नाशिक) या त्यांच्या राहत्या घरी दिवाळी सणाचे लक्ष्मीपूजन करायचे म्हणून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने काढण्यासाठी गेल्या असता त्यांना कपाटात असलेले 3 लाख 7 हजार रुपये किमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 1 लाख 60 हजार रुपये किमतीचा 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असा 9 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज कपाटात दिसून आला नाही. हे सोन्याचे दागिने कोणी तरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पटेल करीत आहेत.

नाशिकमध्ये मविआला खिंडार ! उदय सांगळेसह 'हा' माजी आमदार भाजपच्या वाटेवर

घरफोडीचा तिसरा प्रकार वडाळा रोड येथे घडला. फिर्यादी गीतांजली दिनेश चव्हाण (रा. मंगलप्रभात सोसायटी, हिरवेनगर, वडाळा रोड) यांच्या राहत्या घराची कडी अज्ञात चोरट्याने उघडून घरात प्रवेश केला. फिर्यादी यांनी लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेली 35 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार डंबाळे करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group