द्वारकावरील कराड बंधू चिवडा या दुकानावर टोळक्याचा हल्ला
द्वारकावरील कराड बंधू चिवडा या दुकानावर टोळक्याचा हल्ला
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : तोंडावर मास्क लावून आलेल्या तीन युवकांनी हातात धारदार कोयता घेऊन कराड बंधू चिवडा या दुकानासह शेजारच्या पेढ्याच्या दुकानाच्या काऊंटरवर वार करून काच फोडून नुकसान केल्याची घटना द्वारका येथे घडली.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विक्रांत शांताराम कराड (रा. शिवप्रसाद बंगला, काठे गल्ली, द्वारका) यांचे द्वारका येथे खरबंदा पार्कजवळ कराड बंधू चिवडा व भेळभत्ता विक्रीचे दुकान आहे. काल (दि. 29) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निळा शर्ट, काळी पँट, तोंडावर मास्क परिधान केलेल्या तीन अनोळखी युवकांनी दुकानाच्या दिशेने विटा फेकल्या. 



तसेच अन्य एका युवकाने त्याच्या हातात असलेला धारदार कोयता घेऊन दुकानात असलेल्या लोकांच्या दिशेने फिरवून दुकानाच्या काऊंटरवर दोन-चार वेळा वार केला, तसेच या युवकांनी जाणीवपूर्वक दुकानाच्या दिशेने विटा फेकून व कोयत्याने वार करून फिर्यादीच्या शेजारी असलेल्या उत्तम पेढा सेंटर या दुकानाच्या काऊंटवर कोयता मारून त्याची काच फोडून नुकसान केले. 

हे तीनही हल्लेखोर 18 ते 22 वयोगटातील असून, हे सर्व जण हल्ल्यानंतर तेथून पळून गेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group