नाशिकच्या लासलगाव येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. लासलगाव येथील शिवाजी चौकातील एका नामांकित ज्वेलरी दुकानात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे.
बुरखाधारी महिला आणि तिच्या साथीदाराने हातचलाखीने सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरली. विशेष बाब म्हणजे सोन्याची अंगठी बदलून तिच्या जागी नकली अंगठी ठेवत दुकानातून पसार झाले. या प्रकरणी संबंधित ज्वेलरी दुकान मालकाने लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. हि घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांकडून या दोघांचा शोध सुरू असून लासलगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.