नाशिक मध्ये काँग्रेस आणि मनसेला खिंडार पडले असून माजी नगरसेवकांसह काँग्रेसच्या माजी आमदाराने आज भाजपात प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा भाजपच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात संपन्न झाला.
प्रवेश सोहोळ्यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल, नाशिकचे माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, काँग्रेसचे नरेश पाटील, नीलम पाटील, गौरव गोवर्धन यांनी आज भाजपात प्रवेश केला.