जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी म्हणजेच 13 नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनासाठी फक्त २० मिनिटांचा वेळ दिला असल्याने प्रशासनाला कार्यक्रमाची वेळ आखणी काटेकोरपणे करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नवीन इमारतीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती मिळणार असून, नागरिकांना सुविधा वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान नाशिक शहरातील कुंभमेळा कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल. मात्र, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत आचारसंहिता लागू असल्याने तेथील कामे वगळण्यात आली आहेत. फक्त नाशिक शहरातील कामांचेच भूमिपूजन होईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.