नाशिकच्या पिता-पुत्रांनी केले स्पार्टन रेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व
नाशिकच्या पिता-पुत्रांनी केले स्पार्टन रेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : फिलीपिन्स (पोराक) येथे आयोजित चुरशीची ठरणाऱ्या स्पार्टन रेस (आशिया-पॅसिफिक चॅम्पिअनशिप) मध्ये भारतातर्फे नाशिकच्या चैतन्य भोसले (वय ३३) व त्यांचे पुत्र सचित भोसले (वय ५) यांनी प्रतिनिधित्व केले.



स्पार्टन रेस ही एक सुप्रसिद्ध आंतरराष्टीय ऑब्स्टॅसिले कोर्से स्पर्धा आहे. ज्यामध्ये हजारोच्या संख्येत जगभरातून खेळाडू भाग घेतात. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जगाच्या ज्या पण भागात ही स्पर्धा आयोजित होते त्या भागाचा आव्हानात्मक भूभाग निवडला जातो. प्रत्येक खेळाडू हा ठरलेला अंतर पळून पार करतो. वाटेत वेग-वेगळे अडथळे पार करावे लागतात.

चैतन्य भोसले यांनी ही स्पर्धा १० कि.मी. पळून व २५ अडथळे सारून पार केली. तर सचित भोसले याने (४ - ६ वय श्रेणीत) ८०० मीटर पळून व ९ अडथळे दूरकरत पार केले. लहान मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार बदललेले अडथळे पार करावे लागतात.

चैतन्य भोसले हे स्वतः एक क्रीडा उद्योजक आहेत. चैतन्य भोसले यांचे वडील दीपक भोसले देखील उत्कृष्ट खेळाडू असून, त्यांनी अनेक इरॉनमन स्पर्धा जिंकल्या आहे आणि आता तिसऱ्या पिढीतही वारसा चालू आहे. भोसले यांचे स्पर्धेमागील हेतू भारतीय कुटुंबांमध्ये तंदुरुस्तीसाठी सामाजिक जागरूकता निर्माण करणे आहे. 
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group