नाशिक : सोन्याऐवजी पितळाची बिस्किटे देऊन वृद्धेची 62 हजारांची फसवणूक
नाशिक : सोन्याऐवजी पितळाची बिस्किटे देऊन वृद्धेची 62 हजारांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - सोन्याचे बिस्कीट आहे, असे सांगून पितळी धातूची बिस्किटे देऊन वृद्धेच्या गळ्यातील 62 हजारांचे दागिने अज्ञात चोरट्याने फसवणूक करून चोरून नेले.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विमल पांडुरंग शिरमाळे (वय 70, रा. विठ्ठल पार्क, नांदूर नाका, नाशिक) या काल (दि. 12) दुपारी 12 वाजेच्या सुमारास शालिमार परिसरातील मर्चंट्स बँकेजवळून रस्त्याने पायी जात होते.

त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबविले, तसेच सोन्याचे बिस्कीट आहे, असे सांगून त्याऐवजी पितळी धातूचे बिस्कीट देऊन शिरमाळे यांच्या गळ्यातील 62 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन त्यांची फसवणूक करून निघून गेले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group