नाशिक : भोसला शाळा परिसरात आढळले रानमांजर , अद्यापही शोध मोहीम सुरू
नाशिक : भोसला शाळा परिसरात आढळले रानमांजर , अद्यापही शोध मोहीम सुरू
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या दिसल्याचे एकाने सांगितल्यावरुन कालपासून स्कूल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. या कॅमेर्‍याची आज सकाळी तपासणी केली असता त्यात रानमांजर दिसून आले, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.

कामगारनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर भोसला शाळेच्या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती काल दुपारी मिळाल्यानंतर वन विभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले. त्या ठिकाणी बिबट्याचा शोध घेतला जात होता. या शोध मोहिमेमध्ये थर्मल ड्रोनचा वापर देखील करण्यात आला आणि त्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बिबट्या मात्र दिसून आला नाही. त्यामुळे रात्रभर या परिसरामध्ये ही शोध मोहीम सुरू होती.

या शोध मोहिमेबाबत आज सकाळी वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली की, काल भोसला मिलिटरी स्कूलच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍याची आज सकाळी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रानमांजरचा फोटो कैद झाला आहे. अद्यापर्यंत बिबट्या असल्याचे समजून आले नाही. मात्र बिबट्याचे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू ठेवले आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group