तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच पेटताना दिसत आहे. नाशिकमधील वृक्षप्रेम या वृक्षतोडीबाबत आक्रमक झाले असून यात आता अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील आक्रमक झाले आहेत. सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धक आणि पर्यावरणप्रेमी देखील आहेत. नाशकातील तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
सयाजी शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी या वृक्षतोडीवर संताप व्यक्त केला. तपोवनमधली झाडं तोडणं हा अत्यंत दुर्वेवी असा निर्णय आहे. कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यासाठी इतक्या झाडांची कत्तल करणं हे अजिबातच योग्य नाहीये. एक झाड तोडून दहा झाडे लावू हे तर अतिशय फालतू विधान आहे, आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. एक झाड वाचवण्यासाठी आम्ही १०० माणसं उभी करू, १०० जणांचं बलिदान देऊ...पण ते झाड तोडू देणार नाही, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय.
सरकार आपलं असतानाही इतकं बेजबाबदार वागतंय..माझ्या तोंडात आता शिव्या येतायत, इतका राग येतोय की...असं म्हणत शिंदे यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय. मला अनेकांचे राज्यभरातून फोन येतात. कर्जत, नागपूरहूनही फोन आलेत. नागपुरात ४५ हजार झाले तोडणी जाणार आहेत...ही झाडं आपण वाचवली पाहिजेत...असंही ते म्हणाले.
आता तरी सरकारनं डोळे उघडायला पाहिजेत, किती झालं लावली त्याचा हिशोब तरी द्या... लोकांनी या विरोधात आवाज उठवला की, तो दाबला जातो. हुकुमशाही आहे की लोकशाही हेच समजत नाही.., झाडांवरून राजकारण करू नका...असंही सयाजी शिंदे यांनी यावेळी म्हटलं.