मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या आज जिल्ह्यात सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या आज जिल्ह्यात सभा
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच दिवशी नाशिकमध्ये येत आहेत.

राज्यात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला  पोहोचला आहे. या प्रचाराची सांगता आज होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतवाढीप्रमाणे एक दिवस प्रचाराला मिळाल्यामुळे सर्वच नेत्यांसह कार्यकर्ते तसेच उमेदवारांची धावपळ दिसून येत आहे.

शनिवार आणि रविवार प्रचाराचा मुहूर्त साधल्यानंतर आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपळगाव बसवंतला तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भगूर येथे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्र्यंबकेश्‍वर येथे सभा होणार आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group