अश्लील ॲप्सवर सरकारची कारवाई ! उल्लू ॲप, ALTT सह 'हे' 25 ॲप बॅन
अश्लील ॲप्सवर सरकारची कारवाई ! उल्लू ॲप, ALTT सह 'हे' 25 ॲप बॅन
img
Vaishnavi Sangale
अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि अश्लील कंटेंट वारंवार दाखवनाऱ्या २५  ॲपवर कारवाई करण्यात आली आहे.  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठा निर्णय घेत 25 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. यावरील कंटेंट लहान मुलं आणि तरुणांपर्यंत सहज पोहोचत होता. सेन्सॉरशिपशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक वेब सिरीज प्रदर्शित होत होत्या. समाजातील वाढते मानसिक आणि नैतिक अध:पतन थांबवणे आवश्यक होत चालले होते.

स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाली मोठी चूक झाली... कारण

हे ॲप डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अनुचित सामग्री पसरवत होते. ज्याचा समाजावर नकारात्मक परिणाम होत होता. हे ॲप्स कोणत्याही सेन्सॉरशिप किंवा देखरेखीशिवाय चालवले जात होते, जे आयटी कायदा 2000 आणि इतर सायबर कायद्यांच्या विरोधात आहे असे या ॲप्सबाबत सरकारने सांगितलं आहे.  

धक्कादायक ! जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या मित्रांनी केलं असं काही की..

बॅन करण्यात आलेल्या ॲप्सची नावं
सरकार ने ज्या 25 ॲप्सववर बंदी घातली आहे, त्यामध्ये ALTT, ULLU, Big Shots App, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hit Prime, HotX VIP, Hulchal App, MoodX, NeonX VIP, ShowHit, Fugi, Mojflix  आणि Triflicks हे ॲप्स आहेत. 
ullu | app | banned |
इतर बातम्या
Join Whatsapp Group