सैयारासाठी सिनेमासाठी 'या' मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले, मनसे आक्रमक
सैयारासाठी सिनेमासाठी 'या' मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले, मनसे आक्रमक
img
Vaishnavi Sangale
राज्यात हिंदी आणि मराठीवरुन वाद सुरू असतानाच पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ या हिंदी प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अनेक ठिकाणी तर हाऊसफुल्लचे बोर्ड लागत असल्याचे दिसत आहे. पण याच सिनेमाच्या वेळी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

कर्जाची चिंताच मिटली, पॅनकार्ड वर मिळेल 5 लाखांपर्यंत कर्ज

विशेष म्हणजे, ‘सैयारा’मुळे थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांच्या स्क्रीन्स कमी केल्याने मनसे आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मनसेच्या मराठी बाण्याचा सूड घेण्याकरता काही थिएटर मालकांचं षडयंत्र सुरु असल्याचा मनसेकडून आरोप होत आहे. थेअटर मल्टीप्लेक्स मालकांनी सैय्यारा चित्रपटासाठी स्क्रीन अडवून ठेवल्या आहेत. मनसे नेते अमेय खोपकरांची निर्मिती असलेल्या ये रे ये रे पावसा 3 या चित्रपटाऐवजी यशराज फिल्म्सच्या सैय्यारा चित्रपटाला स्क्रीन दिल्या जात आहेत, असे संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

अश्लील ॲप्सवर सरकारची कारवाई ! उल्लू ॲप, ALTT सह 'हे' 25 ॲप बॅन

आमची आज बैठक होती याबद्दल काही सांगता येणार नाही. पण, हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी होत आहे हे दिसून येत आहे. पण, आम्ही आत्ताच त्यांना सांगतो आहे की, ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही. अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या सिनेमावर अशी गोष्ट होणं हे वाईट आहे. मल्टीप्लेक्सवाले हे जाणून-बुजून करत आहेत, त्यांना पक्षातर्फे आम्ही आता इशारा देतो, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group