नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- सिलेंडरच्या किमतींत 41 रुपयांनीवाढ केली आहे, तर ही वाढ 19 व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत करण्यात आली आहे.
अद्ययावत किमतींनुसार, राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता 1796.50 रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1728.00 रुपयांवरुन 1749.00 रुपये झाली आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किमती वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या असून बदललेल्या किमती 1 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.