सणासुदीच्या आधीच महागाईचा चटका; गॅस सिलिंडरच्या किमतीत
सणासुदीच्या आधीच महागाईचा चटका; गॅस सिलिंडरच्या किमतीत "इतक्या" रुपयांची वाढ
img
दैनिक भ्रमर
मुंबई :- केंद्र सरकारने ३० ऑगस्ट रोजी देशातील सामान्य जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देत १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात केली होती. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५० ते १५७ रुपयांची कपात केली होती. 

मात्र, आज ऑक्टोबर महिना सुरू होताच महागाईची झळ सर्व सामान्यांना बसणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली असून त्याअंतर्गत १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर २०९ रुपयांनी महागला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किंमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

दरम्यान, २०९ रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलिंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सप्टेंबरमध्ये सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर याच १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची १,५२२ रुपयांमध्ये विक्री केली जात होती. आता यात २०९ रुपयांची वाढ झाल्यानंतर याच सिलिंडरसाठी १,७३१ रुपये मोजावे लागणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group