आयुर्वेदात कडुलिंबाला फक्त एक झाडच नाही तर एक नैसर्गिक औषध मानले जाते. ते ‘सर्व रोग निवारणी’ म्हणजेच सर्व रोगांचे उच्चाटन करणारे असल्याचे म्हटले जाते. विशेषतः दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कडुलिंबाच्या पानांमध्ये आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांचा साठा आहे. कडुलिंबाची पाने चावून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर देखील मानले जाते. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास कोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
हे ही वाचा
कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे
१) शरीर डिटॉक्स करते: कडुलिंबाची पाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते
२) मधुमेहावर नियंत्रण: काही संशोधनांच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की कडुलिंबाचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळू शकतो. कडुलिंब रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो.
३) तोंडाचे आरोग्य - कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. दातदुखी, हिरड्यांना सूज येणे, तोंड येणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल.
हे ही वाचा
४) संसर्गापासून संरक्षण - बदलत्या हवामानामुळे काही आजारांच्या संसर्गाची समस्या उद्भवतात. यासाठी कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन करावे. यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
५) त्वचेच्या समस्या - रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास त्वचेला लाभ मिळतात. यामुळे पिंपल्स, एक्झिमा यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल.
६ ) पचनक्रिया निरोगी राहते – कडुलिंब यकृत आणि आतडे स्वच्छ करते. ते गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या कमी करते. अशा परिस्थितीत, पचनक्रिया बिघडलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरू शकते.
हे ही वाचा
कडुनिंबाचा हेअर मास्क म्हणूनही वापर
कोंड्यासाठी कडुनिंबाचा हेअर मास्क हा एक उत्तम उपाय आहे. कडुनिंबाची थोडी पाने घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक वाटावीत व त्यामध्ये एक चमचा मध घालावा. हे दाटसर मिश्रण हेअर मास्क प्रमाणे संपूर्ण टाळूला व केसांना लावावे व 20 मिनिटे तसेच राहू द्यावे. ते वाळल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवावेत.
सेवन कसे करावे?
यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी ४-५ मऊ कडुलिंबाची पाने धुवून चावा. जर त्याची चव खूप कडू असेल तर तुम्ही ते कोमट पाण्याने गिळू शकता. किंवा तुम्ही पाण्यात मिसळून कडुलिंबाचा रस (२०-३० मिली) देखील पिऊ शकता. कडुलिंबाचे सर्व फायदे असूनही, ते जास्त प्रमाणात सेवन करू नका. तसेच, गर्भवती महिला, लहान मुले आणि कमकुवत पचनसंस्था असलेल्यांनी डॉक्टरांना विचारल्यानंतरच ते त्यांच्या दिनचर्येत समाविष्ट करावे.