ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू होणार. त्यामुळे जर तुम्ही पात्रता पूर्ण केलेली असेल तरच आता ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला उभे राहता येणार आहे.
थकबाकीदार नकोच
ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकी मोठी आहे, हे कमी करणं एक मोठं आव्हान ठरतय. त्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. यात समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे. तर पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीय.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील सरपंच कार्यशाळेत बोलत होते. शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिलीय.