५ नोव्हेंबर २०२३
नाशिक :- जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या 200 जागांसाठी तसेच 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत आहे. या दरम्यान इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धारगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात शांतता पोलिसांच्या उपस्थितीत मतदान सुरु आहे.
Copyright ©2026 Bhramar