अहिल्यानगर शहरात सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता पहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकानी मुस्लीम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला.
मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंच्या नावाची विटंबना केल्या प्रकरणी मुस्लिम समाज संतप्त झाला होता. दरम्यान यावेळी आंदोलने करण्यात आली. आज सकाळी अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज आक्रमक झाला अन् रस्त्यावर उतरला. अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
कोटला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लीम समाजाकडून कोटला गावात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मुस्लीम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे नगरमधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपिला ताब्यात घेतले आहे.