मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरण्याच्या तयारीत , आता 'या' मुद्द्यांकडे वेधणार लक्ष
मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरण्याच्या तयारीत , आता 'या' मुद्द्यांकडे वेधणार लक्ष
img
दैनिक भ्रमर
मराठा आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारला घेरण्याचा तयारीत आहे. मराठा आरक्षणानंतर आता जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर फडणवीस सरकारला घेरणार आहे. आज ते बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्याला जाणार आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.  


प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या संभाजीनगरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मला जास्त बोलता येत नाही. मंदिरात जाऊन पूजन करणार आणि परत येणार आहे. मला उभे राहता येत नाही. मी भाषण करणार की नाही, हे सांगता येत नाही. तिथे मंदिरात बसून चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांसाठी लढ्याची घोषणा तिथे करणार आहे. वेळ प्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, शेतकऱ्यांसाठी फक्त मी लढ्याची घोषणा करणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी जीआर निघाला आहे. मागील ७० वर्षांतील सर्वात मोठा फायदा झाला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी की पूरग्रस्तांना सरसकट मदत.. मनोज जरांगे पाटील कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा असा इशारा द्यावा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group