मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांनी केली 'ही' महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांनी केली 'ही' महत्त्वाची घोषणा
img
Dipali Ghadwaje
मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट. १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
राठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.

आज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करु.. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज  मनोज जरांगे पाटील यांनी भांबेरी गावातून पुन्हा जालन्याकडे परतण्याचा निर्णय घेतला.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group