दिलासा मिळणार ? पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता
दिलासा मिळणार ? पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता
img
वैष्णवी सांगळे
पेट्रोल डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ज्याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. आता मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांना खुशखबर मिळू शकते. वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


सध्या कच्च्या तेल प्रति बॅरल ६४ डॉलरवर आहेत. मागच्या वर्षी ७ ऑक्टोबरला कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८१ डॉलर होते. यानंतर यावर्षी हे दर खूप घसरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीदेखील कमी होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोलचे दर अवलंबून असतात. जर कच्च्या तेलाचे दर घसरले की आपोआप इंधनाच्या दरात कपात होते.

याशिवाय भारत रशियाकडून आणखी स्वस्तात तेल खरेदी करत आहे. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये देशात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून 6.05 लाख bpd तेल आयात केले.हे ऑगस्टच्या तुलने ३२ टक्के कमी आहे.यामुळे रुसमधील कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. अमेरिकेने लावलेला टॅरिफ आणि दबावामुळे ही आयात कमी झाली आहे. दरम्यान, यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group