महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते. पण त्याआधी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रत्येकी दोन रुपयांची कपात केली. शुक्रवारी सकाळपासून ही दरकपात लागू झाली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर याबाबत घोषणा केली. या दरकपातीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये तर डिझेलचा दर ९०.१५ रुपये प्रतिलिटर असेल. महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर सर्वात जास्त असल्यामुळे सर्व महानगरांमध्ये मुंबईत इंधन सर्वात महाग आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वात कमी आहेत.