
मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. मनमाड नगर परिषदेच्या एकूण 16 प्रभागातील 33 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
त्यापैकी 17 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे तर अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 9 जागा आरक्षित करण्यात आल्या आहे.आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे.