विराट कोहली १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या आधी विराट कोहली दिल्लीजवळच्या गुरुग्राममधल्या त्याच्या घरी पोहोचला. गुरुग्राममधल्या प्रॉपर्टीचे अधिकार म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नी विराटने त्याचा भाऊ विकास कोहलीच्या नावावर केलं आहे.

मंगळवारी दुपारी विराट कोहली गुरुग्राममधल्या वजीराबाद तहसील कार्यालयात गेला. तिकडे जाऊन विराटने गुरुग्राममधल्या प्रॉपर्टीचं जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी भाऊ विकास कोहलीच्या नावावर केली. त्यासाठी विराट कोहलीने गुरुग्रामच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
विराटने मोठ्या भावाकडे जनरल पावर ऑफ अटॉर्नी सोपवली म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की, गुरुग्रामवाल्या संपत्तीचे सर्व निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आता विकास कोहलीकडे आहेत. आता प्रश्न हा आहे की, विराट कोहलीला असं का करावं लागलं?. तर त्या मागचं कारण आहे, विराट पत्नी अनुष्का आणि मुलांसोबत जास्त काळ लंडनमध्ये असतो.
भारताबाहेर जास्त काळ असल्याने विराटने आपला भाऊ विकास कोहलीला जनरल पावर ऑफ अटॉर्नी दिली आहे. विराट कोहलीने गुरुग्रामची जी प्रॉपर्टी मोठ्या भावाच्या नावावर केली, त्याची एकूण किंमत १०० कोटी पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातय.
गुरुग्रामच्या DLF सिटी फेज-१ मध्ये विराट कोहलीची एक आलिशान कोठी आहे, ती त्याने 2021 मध्ये विकत घेतली होती मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या कोठीची किंमत ८० कोटी पेक्षा जास्त आहे. कोठी शिवाय गुरुग्राममध्ये विराटचा एक लक्जरी फ्लॅट सुद्धा आहे. विकास कोहलीवर कोठीसोबत आता फ्लॅटची सुद्धा जबाबदारी असेल. विराट कोहलीच्या त्या सर्व प्रॉपर्टीची किंमत 100 कोटी पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातय.