अकाऊंटला जादा पैसे जमा झाल्याचे भासवून विद्यार्थिनीची मोठी फसवणूक
अकाऊंटला जादा पैसे जमा झाल्याचे भासवून विद्यार्थिनीची मोठी फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - अकाऊंटवर जादा पैसे जमा झाल्याचे खोटे मेसेज पाठवून विद्यार्थिनीची 81 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



माजी खासदार डाॅ. हिना गावित यांनी केला ‘या’ पक्षात प्रवेश

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रेणुका विद्याधर सावंत (रा. जय नीलकंठ सोसायटी, अभियंतानगर, कामटवाडा) ही विद्यार्थिनी घरी अभ्यास करीत असताना तिच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. फोनवरून बोलणार्‍या आरोपीने फिर्यादीच्या वडिलांच्या एलआयसीचे पैसे फिर्यादीच्या अकाऊंटवर पाठवीत असल्याचे खोटे सांगून ते पैसे खात्यावर ट्रान्झॅक्शन केल्याचे खोटे मेसेज पाठविले. 

जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट, मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' ७ मोठे निर्णय

तसेच फिर्यादीच्या अकाऊंटला जादा पैसे जमा झाल्याचे भासवून अज्ञात आरोपीने फिर्यादीला ही रक्कम वेळोवेळी पुन्हा पुन्हा पाठविण्यास सांगून सावंत यांची एकूण ८१ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group