नाव ठेवायची तर ठेवा, पण... लेकीच्या साखरपुड्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना इंदोरीकर महाराजांचं प्रत्युत्तर
नाव ठेवायची तर ठेवा, पण... लेकीच्या साखरपुड्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना इंदोरीकर महाराजांचं प्रत्युत्तर
img
वैष्णवी सांगळे
निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आपल्या विनोदी शैलीतून किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत आहे. शेतकरी , व्यसनाधीन तरुणाई , सासू सुना , लग्न आणि त्यावर होणारा अमाप खर्च यांसारखे अनेक मुद्दे ते कीर्तनाच्या माध्यमातून मांडत असतात. ४ नोव्हेंबरला निवृत्ती महाराजांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. पण त्यांनतर आता महाराज टीकेचे धनी ठरले आहे. 



अहिल्यानगरमधील संगमनेर येथे वसंत लॉन्स या ठिकाणी इंदोरीकर  महाराजांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या लेकीचं नाव ज्ञानेश्वरी इंदोरीकर आहे. त्यांनी साहिल चिलप यांच्यासोबत साखरपुडा केला.ज्ञानेश्वरी इंदोरीकर यांच्या साखरपुड्याला लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. अनेक राजकीय मंडळींनीही या समारंभास उपस्थिती लावली होती. दरम्यान, या कार्यक्रमासाठी खूप खर्च करण्यात आल्याचे दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

इंदोरीकर महाराज म्हणाले... 
साखरपुड्याच्या सोहळ्याला कोणताही सत्कार सोहळा ठेवला नाही,त्याऐवजी १ लाख ११ हजारांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हे पैसे देण्यात आले.

इंदोरीकर महाराज म्हणाले की, मी लग्न साध्या पद्धतीने करा असं सांगतो आणि लेकीचा साखरपुडा थाटामाटात केला. हे त्यांना दाखवण्यासाठीच आहे की, आपण बदल करु शकतो. आपल्यात बदल करण्याची ताकद आहे. कार्यक्रमात जेवण वाढवणारे वारकरी वेशात होते. जेवण महाराष्ट्रीन होतं, चायनीज नव्हतं, व्याही भेटीचा कार्यक्रम बंद केला. तुम्हाला नाव ठेवायची असेल तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group