सोन्याच्या दरात घसरण ; १ तोळं सोन्याचा आजचा भाव किती ?
सोन्याच्या दरात घसरण ; १ तोळं सोन्याचा आजचा भाव किती ?
img
वैष्णवी सांगळे
सध्या सर्वत्र लग्नसराईचा माहोल आहे. लग्न म्हटलं की, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आलीच. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसत आहे. काल २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ६६० रूपयांची वाढ झाली होती. मात्र, आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. 

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २८० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी १,३०,२०० रूपये मोजावे लागणार आहेत. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,८०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी १३,०२,००० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी १,१९,३५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी ११,९३,५०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी ९७,६५० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,१०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७६,५०० रूपये मोजावे लागतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group