प्रसिद्ध अभिनेत्यानं आयुष्य संपवलं; ४६ व्या वर्षी कलाकारानं उचललं टोकाचं पाऊल
प्रसिद्ध अभिनेत्यानं आयुष्य संपवलं; ४६ व्या वर्षी कलाकारानं उचललं टोकाचं पाऊल
img
वैष्णवी सांगळे
सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे.  वयाच्या 46 व्या वर्षी प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते जेम्स रॅन्सोन यांचे निधन झाले आहे. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरच्या मते, जेम्स रॅन्सोन यांनी शुक्रवारी आयुष्य संपवलं. घरातच ते मृतावस्थेत आढळले. रॅन्सोन यांच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. या बातमीने चित्रपट आणि टेलिव्हिजन जगतात धक्का बसला आहे.जेम्स रॅन्सोन यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले आहेत.

रॅन्सोन हे भयपट मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात. जेम्स रॅन्सोन हे एचबीच्या आयकॉनिक क्राइम ड्रामा मालिका 'द वायर' मधील चेस्टर जिग्गी सोबोटकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये त्यांनी गुन्हेगारीच्या जगतात अडकलेल्या एका डॉक वर्करची भूमिका साकारली होती. जेम्स रॅन्सोनच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही खूप कौतुक केले होते. या भूमिकेमुळे त्यांना टेलिव्हिजन जगतात वेगळी ओळख मिळाली होती..  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेम्स रॅन्सोन यांनी २००० साली मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केली. "द वायर" च्या दुसऱ्या सिझनमधील झिग्गी सोबोटका या पात्रामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली. 'बॉश', 'पोकर फेस' तसेच 'मोजेक' या मालिकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी अनेक हॉरर चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

जेम्स रॅन्सोन  यांचा 'ब्लॅक फोन 2' हा चित्रपट शेवटचा ठरला. हा चित्रपट ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण या चित्रपटात त्यांची भूमिका दमदार ठरली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group