मनोरंजन विश्वाला धक्का ! प्रसिद्ध अभिनेत्रीची क्रूर हत्या, बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात
मनोरंजन विश्वाला धक्का ! प्रसिद्ध अभिनेत्रीची क्रूर हत्या, बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात
img
वैष्णवी सांगळे
हॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुख:द बातमी समोर येत आहे. 'द लायन किंग' फेम अभिनेत्री इमानी दिया स्मिथ हिचं निधन झालं आहे. वयाच्या २५ व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. न्यू जर्सीमध्ये चाकूने वार केलेल्या अवस्थेत अभिनेत्री आढळून आली. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृ्त्यू झाला. 

द लायन किंग' च्या स्टेज व्हर्जनमध्ये यंग नालाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या २५ वर्षीय अभिनेत्री इमानी डीया स्मिथची, रविवार, २१ डिसेंबर रोजी इमर्जन्सी कॉलनंतर तिच्या न्यू जर्सी येथील घरी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. 

न्यू जर्सी काउंटी शेरिफ ऑफिसने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, '२१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:१८ वाजता अधिकाऱ्यांना चाकूने हल्ला झाल्याची तक्रार करणारा ९११वर कॉल आला. ग्रोव्ह अव्हेन्यूवरील तिच्या घरी पोहोचल्यावर त्यांना स्मिथवर चाकूने केलेल्या जखमा आढळल्या. स्मिथला तातडीनं रॉबर्ट वुड जॉन्सन युनिव्हर्सिटी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र अभिनेत्रीचा रुग्णालयातच मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, इमानीचा ३५ वर्षीय बॉयफ्रेंड जॉर्डन डी. जॅक्सन-स्मॉलला अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रेस रिलीजमध्ये पुढे म्हटलं आहे की, 'इमानी आणि जॅक्सन स्मॉल एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे ही अचानक घडलेली घटना नव्हती. प्राथमिक चौकशीनंतर, अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडवर अनेक आरोप लावण्यात आले आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group