नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नववर्षाची तयारी काहींसाठी जीवघेणी ठरली आहे. स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध क्रांस मोंटना स्की रिसॉर्टमध्ये न्यू इअरचे सेलिब्रेशन करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर बारला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा स्फोट स्वित्झर्लंड शहरातील क्रॅन्स-मोंटाना येथील स्की रिसॉर्टमध्ये झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यू इअरचे सेलिब्रेशन करत असताना बारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला.या स्फोटानंतर बारमध्ये भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये अनेक जण अडकले होते. स्वित्झर्लंड पोलिसांच्या बचाव पथकांनी त्यांना बारमधून बाहेर काढले. जखमी झालेल्या या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही स्फोटाची घटना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. हा स्फोट कॉन्स्टेलेशन बारमध्ये झाला. या बारमध्ये मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. या स्फोटामुळे बारचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, या बारमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. क्रॅन्स मोंटाना येथील आलिशान अल्पाइन स्की रिसॉर्टमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.