२०२४ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहे. नवीन वर्षात एलपीजी गॅस सिलिंडरपासून ते यूपीआय पेमेंटपर्यंत सर्व नियम बदलणार आहेत. या नवीन नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
१ जानेवारी २०२५ पासून नवीन नियम लागू होणार आहेत.यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमती बदलू शकतात. दर वर्षी ऑइल मार्केटिंग कंपनी या दरांमध्ये बदल करतात. त्याचसोबत UPI 123Pay पेमेंटबाबतचे नियम बदलणार आहेत. याचसोबत ईपीएफओ पेन्शनबाबत नियम बदलणार आहेत.
LPG च्या किंमती
दर महिन्याला १ तारखेला ऑइल कंपन्या घरगुती आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीवर संशोधन करते आणि नवीन किंमती जाहीर करते. काही दिवसांपूर्वी १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल करण्यात आले होते. १४ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत.
EPFO चे नियम नवीन
वर्षात कर्मचारी भविष्य निधी योजनेतील नियम बदलणार आहेत. पेन्शनबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतात.
UPI 123 Payचे नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंटबाबत नियम बदलले आहेत. ऑनलाइन पेमेंटसाठी UPI 123 Pay ची सुरुवात केली. यामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये युजर्स १०,००० रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करु शकतात.
शेअर मार्केटबाबत नियम
सेन्सेक्स आणि सेन्सेक्स ५० मध्ये मंथली एक्सपायरीबाबत बदल करण्यात आले आहे. आता हे शुक्रवारी नाही तर मंगळवारी होणार आबे. तसेच तीन महिने आणि सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट्सची एक्सपायरी मंगळवारी होणार आहे.
शेतकऱ्यांचे लोन
१ जानेवारी २०२५ पासून शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या लोनबाबत बदल करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत लोन कोणत्याही गॅरंटशिवाय मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.