महत्वाची बातमी : थर्टी फर्स्टला एकही चुकीचं पाऊल महागात पडेल , वाचा
महत्वाची बातमी : थर्टी फर्स्टला एकही चुकीचं पाऊल महागात पडेल , वाचा
img
Dipali Ghadwaje
थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. यासाठी १०२ अधिकारी आणि ६२५ कर्मचाऱ्यांसह SRPF ची एक प्लाटून तैनात असणार आहे, अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

थर्टी फर्स्टला पहाटे चार वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक जण रात्री उशिरा दारू पिऊन गाड्या चालवण्याची शक्यता आहे. यात कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार होऊ नये, या अनुषंगाने पोलिसांकडून उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात २९ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.

यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तसेच थर्टी फर्स्टच्या रात्री तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुंड यांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवलं जाणार असल्याचीही माहिती गोरे यांनी दिली आहे.

परिमंडळ ४ मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल १०२ कर्मचारी आणि ६२५ कर्मचाऱ्यांची फौज तैनात असणार असून SRPF ची एक प्लाटून देखील पोलिसांच्या सोबतीला तैनात असणार आहे, अशी माहितीही सचिन गोरे यांनी दिली आहे.
 
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group