गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; मंत्री अब्दुल सत्तारांकडून थेट शिवीगाळ
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; मंत्री अब्दुल सत्तारांकडून थेट शिवीगाळ
img
Dipali Ghadwaje
महायुती सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. यामागचे कारणही तसेच आहे.

१ जानेवारीला सत्तार यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात व्हावं, यासाठी मंत्रीमहोदयांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला. यासाठी मोठी पोस्टर्सबाजी देखील करण्यात आली. गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड येथे गर्दी केली.

दरम्यान, गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणे हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रम मध्यस्थीच बंद पडला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तरुणांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.

सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेतला. हुल्लडबाज तरुणांवर लाठीमार करा, असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. इतकचं नाही, तर सत्तार यांनी भर स्टेजवरून तरुणांना शिवीगाळ देखील केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ पाहून नेटकरी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करीत आहेत. महायुती सरकारमधील इतक्या मोठ्या मंत्र्याला भर स्टेजवरून शिवीगाळ करण्याची भाषा शोभते का? असा सवाल सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group