ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन
img
दैनिक भ्रमर
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 

प्रभा अत्रे आज 'स्वरप्रभा' या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होत. वयाच्या 92 वर्षी देखील त्या गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित रहात होत्या.

पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं.

प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं , तसेच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

प्रभा अत्रे कोण होत्या? 
प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group