मुंबई : आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी पंकज उधास यांनी अंतिम श्वास घेतला. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. उधास यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
पंकज उदास यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. पंकज उदास यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. पंकज उदास यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून चाहत्यांना धक्का बसलाय. त्यांच्या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले. 1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली. या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
चिट्ठी आई है आई है…, ना कजरे की धार ना मोतियों के हार…, आज फिर तुम पे प्यार आया है…, चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल… आदी लोकप्रिय गाण्यांमुळे पंकज उधास तरुणाईंच्या गळातील ताईत झाले होते. त्यांच्या निधनामुळे देश एका मोठ्या गीतकाराला मुकला आहे.