मोठी बातमी ! भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला
मोठी बातमी ! भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला
img
Nandini khandare More
पंजाबमधून मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयावर मोठा हल्ला झाला आहे. भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे.

पंजाबच्या संगरूरमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र कार्यालयाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी बियर बॉटचा वापर करून पेट्रोल बॉम्ब बनवला आणि तो भाजप कार्यालयावर फेकला. ही घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडल्याची माहिती समोर येत आहे. हा पेट्रोल बॉम्ब भिंतवर धडकून फुटला, त्यानंतर भाजप कार्यालयाला आग लागली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याबाबत बोलताना संगरूरचे एसपी दविंदर अत्री यांनी सांगितलं की, आम्ही घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पहाणी केली आहे. एका बीअर बॉटलला पेट्रोल बॉम्ब बनवून हल्लेखोरांनी कार्यालयावर हल्ला केला. सध्या आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्या कोणी हा हल्ला केला असेल त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, कोणाचीही गय केली जाणार नाही.

यापूर्वी देखील झाले आहेत हल्ले 

दरम्यान भाजप कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वी देखील भाजप कार्यालयावर हल्ले झाले आहेत.  गेल्या महिन्यात भाजप नेत्याच्या दवाखान्यावर हल्लेखोरांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group