आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.