मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प भारताला देणार सर्वात मोठा झटका, ब्रिक्स शिखर परिषदेत काय ठरलं ?
मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प भारताला देणार सर्वात मोठा झटका, ब्रिक्स शिखर परिषदेत काय ठरलं ?
img
Nandini khandare More
डोनाल्ड ट्रम्प भारताला देणार सर्वात मोठा झटका देणार असल्याची शक्यता आहे. कारण जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. अखेर आता भारताची भूमिका समोर आली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवणार नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान , भारताने नुकतचं ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. या शिखर परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन देखील सहभागी झाले होते. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची धमकी या आधीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. अमेरिकन सीनेटने हे विधेयक गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी मंजूर केले होते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा कायदा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. आता लवकरच यावर मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जाणार आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो.  भारतासह चीनला देखील याचा मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान या विधेयकाला मंजुरी मिळाली तर जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. त्यामुळे भारत काय भूमिका घेणार? अशा स्थितीमध्ये रशियाकडून तेलाची खरेदी बंद करणार का? असा प्रश्न निर्माण होत होता, परंतु अखेर आता भारताची भूमिका समोर आली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवणार नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आलं आहे.  मात्र जर दुसरीकडे अमेरिकेनं शंभर टक्के टॅरिफ लावलाच त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो.

इतर बातम्या
Join Whatsapp Group