दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल !आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली; काय आहे घडामोड ?
दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल !आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली; काय आहे घडामोड ?
img
Nandini khandare More
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सलियन प्रकरणाने संपूर्ण राजकरणात खळबळ निर्माण केली असून आता या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. आता वेगळे लागले आहे. या प्रकरणाचा तपास CBI कडे गेल्यानंतर यात आदित्य ठाकरेंसह काही जणांच्या नावाचा उल्लेख आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्ट करत आपली बाजू मांडली. या पोस्टनंतर सतीश सलियन यांनी आदित्य ठाकरेंवर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते, आज याबद्दलची नोटीस देण्यासाठी सतीश सलियन आणि वकील हे थेट मातोश्रीवर दाखल झाले. 

यावेळी तिथे शिवसैनिकांचाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आदित्यंच्या लोकांनी मातोश्रीबाहेर येऊ नका अशी धमकी दिल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला. त्यांनी सांगितलं की मातोश्रीवर जाऊन नोटीस देण्याचा निर्णय आपण केवळ धमकी दिली गेल्यामुळेच घेलत्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कला नगरच्या प्रवेश द्वारावर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली, अशीही माहिती त्यांनी दिली.

मातोश्री परिसरात नेमकं काय घडतंय?
सतीश सालियन आणि त्यांचे वकिल निलेश ओझा यांच्यासह मातोश्री कला नगरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी माताश्रीमध्ये जात नोटीस देण्याचा प्रयत्न केला पण कलानगरच्या गेटवरच त्यांना आदित्य ठाकरेंचे वकिल भेटले आणि त्यांनी तिथेच त्यांच्याकडून नोटीस स्वीकारली अशी माहिती दोन्ही बाजूच्या वकिलांनी दिली आहे.

दिशाचे वडील सतीश सालियन नेमकं काय म्हणाले?
माझ्या मुलीची हत्या झाली, तिच्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे ही नोटीस बजावत आहोत. ही नोटीस 500 कोटींची आहे. माझ्या वकिलांना तुम्ही हे प्रकरण कोर्टात नाही चालवू शकणार, अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे. ही धमकी आदित्यच्या माणसांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं की मी नोटीस काय आहे ते बघितलं नाही पण रिसिव्हड म्हणून मी नोटीस घेत आहे. त्यानंतर माध्यमांसमोर ठाकरेंच्या वकिलांनी नोटीशीतील काही भाग वाचूनही दाखवला. ज्यामध्ये 500 कोटींच्या मानहानीचा उल्लेख असल्याचे त्यांनीही सांगितलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group