एक मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावली असून याप्रकरणात त्यांचीही चौकशी होणार आहे.
आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. तसेच आपल्याकडे पुरावे असल्याचेही राणे म्हणाले होते. त्यानंतर आता याप्रकरणी नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. त्या हिंदू मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, सीसीटिव्ही फुटेज, रजिस्टरचे कागद फाडण्यात आले. मी पोलिसांना सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. मी मुंबई पोलीस आणि SIT समोर सगळे पुरावे देणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.