मंत्री नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल, घेतला
मंत्री नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल, घेतला "हा" मोठा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यावेळी 33 आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर आता सर्वच मंत्र्यांनी कामाला सुरुवात केली आहे. 

अशातच  मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी  नुकतंच महाराष्ट्र बंदरे विकास विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. मुंबईतील महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या इमारतीत ही बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा आढावा घेतला.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवत  मंत्री नितेश राणे यांनी   मोठा निर्णय घेतला आहे. नितेश राणे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक ट्वीट शेअर केले आहे. यात त्यांनी त्यांच्या नावाचे एक अधिकृत पत्र काढले आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच ही प्रत सर्व महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग यांनाही पाठवण्यास सांगितली आहे.

नितेश राणेंच्या पत्रात काय?

“मी आपणांस असे सूचित करतो की, माझ्या प्रत्येक जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये, अशी सूचना आपल्या अधिकाऱ्यांना देण्यात यावी”, असे नितेश राणे यांनी नमूद केले आहे. त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.
 

दरम्यान  या बैठकीदरम्यान वाढवण बंदराचे सविस्तर सादरीकरण देखील करण्यात आले. महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंदरांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. गुणवत्तेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त ताकीद नितेश राणेंनी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही नितेश राणे म्हणाले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group