आ. नितेश राणे यांची ठाकरे व राऊतांवर जहरी टीका; म्हणाले राम मंदिरचे आंदोलन सुरु होते त्यावेळी...
आ. नितेश राणे यांची ठाकरे व राऊतांवर जहरी टीका; म्हणाले राम मंदिरचे आंदोलन सुरु होते त्यावेळी...
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):- राम मंदिरचे आंदोलन सुरु होते त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर कॅमेरा पुसत होते तर संजय राऊत यांनी मंदिरा विरोधात सामना मध्ये लेख लिहिला होता. त्यामुळे त्यांचे राम मंदिर बाबत योगदान नाही अशी जहरी टीका आ. नितेश राणे यांनी केली.

नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्या करीता आ. नितेश राणे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभेमध्ये मी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आरोप केले. त्या प्रकारणी त्याची चौकशी सुरु असून त्यावर योग्य वेळी बोलले जाईल असे आ. राणे म्हणाले.

भाजपा वाले चिलीम ओढून मग बोलतात यावर बोलताना आ.राणे यांनी संजय राऊत सकाळी नाइन्टी पिऊन बोलतात, नाशिक मध्ये ते आले की बोलण्यापूर्वी पिऊन बोलतात हवं तर वाहतूक पोलिसाकडे असलेल्या ड्रीकिंग मशीन लावून बघा, ते पळून जातील अशी एकेरी शब्दात बोचारी टीका केली.

नाशिक मधील भद्रकली, जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण सुरु आहेत. रात्री बेरात्री हॉटेल, बार सुरु असतात. अनेक ठिकाणी दुचाकी वरून एमडीची विक्री होत असलेचा आरोप करीत याबाबत मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या सोबत चर्चा झाली असून त्यांनी कारवाई साठी काही तारख्या दिल्या आहेत.

त्या काळात जर त्यांनी ॲक्शन घेतली नाही तर नाशिक मध्ये जनआंदोलन उभे करू असा इशारा आ. राणे यांनी देत हिंदू समाजा विषयी सरकार ही कुठलेही तडजोड करणार नाही. हिंदू नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे असे आवाहन आ राणे यांनी केले.
मराठा आरक्षण आमचे सरकार देणार मात्र कुठल्याही आरक्षणला धक्का न लावता देणार असल्याचे आ. राणे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार संघ कार्यालयात गेले नाही या विषयी बोलताना आ. राणे म्हणाले कि, अमोल मिटकरी नालायक माणूस आहे. मिटकरी यांची भूमिका म्हणजे अजित पवार यांची भूमिका होऊ शकत नाही. त्यांची भूमिका विचारावे लागेल.

सिंधुदुर्ग किल्ल्याला सरकार च्या अधिकारी यांनी तुटपुंजी मदत केली, कोण अधिकारी मस्ती करतोय बघतो, जो सापडला त्याचा कडेलोट करायची व्यवस्था किल्ल्यावर आहे, असा गर्भित  इशारा आ राणे यांनी दिला.

भोंग्या विषयी राज ठाकरे यांनी आंदोलन छेडले होते त्याला पाठींबा आहे का यावर बोलताना आता कोणी राहिले असेल तर विचारा असे भाष्य करून पुन्हा यू टर्न घेत राणे यांनी मनसे संपली नाही तर उद्धव ठाकरे संपले, असे बोलून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे टाळले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group