शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उद्यापासून नाशिकमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आजपासूनच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत.
उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता मातोश्रीहून रवाना होतील. विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल.
1 वाजता ते ओझरहून भगूरला जाणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ते सावरकरांना अभिवादन करतील.
2 वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू हॉटेलकडे जाणार.
सायंकाळी 5.30 वाजता काळाराम मंदिराकडे निघणार. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार.
6.30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरती करणार आहेत.
23 तारखेला बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करून महाअधिवेशनाला सुरुवात होणार, 10 ते 2 वाजेपर्यंत प्रमुख वक्ते बोलणार असून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल.
सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.