ट्विट का डिलिट केलं? निलेश राणे यांनी दिलं एका वाक्यात उत्तर ; नेमकं काय घडतंय?
ट्विट का डिलिट केलं? निलेश राणे यांनी दिलं एका वाक्यात उत्तर ; नेमकं काय घडतंय?
img
Dipali Ghadwaje
ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. परंतु काहीवेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट देखील केली आहे. पोस्ट का हटवली, यासंदर्भात आता निलेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
 
निलेश राणे यांचं उत्तर

निलेश राणे यांनी म्हटलंय की, नितेश माझा भाऊ आहे. त्याने मला जे अधिकार दिलेत. त्या अधिकाराने बोललो आहे. मी हक्काने बोललो आहे. त्याने मला वडिलांप्रमाणेच मान दिलाय, त्याच अधिकाराने मी बोललो आहे. मला जो मेसेज द्यायचा होता, तो दिला. याअगोदर सुद्धा मी डिलिट केलेली आहेत, याचा वेगळा अर्थ काढू नका. हा एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला सल्ला होता, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी काय म्हटलं होतं?

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केली होती. त्यानंतर समितीच्या कामांवर स्थगिती आणली. या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं होतं, कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे. नितेश राणे यांच्या याच वक्तव्याला उद्देशून निलेश राणे यांनी ही पोस्ट केली होती. तर नितेश राणे यांनी या पोस्टला उत्तर सुद्धा दिलं होतं.

निलेश राणेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याच्यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही tax free आहात, असा रिप्लाय नितेश राणे यांनी दिला होता. यावर नितेश राणे यांनीही ट्विट केलं होतं. निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असे नितेश यांनी म्हटले होते. यानंतर निलेश राणे यांनी आपली पोस्ट डिलिट केली होती.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group