आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्या पुण्यातील मालमत्तेवर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. मालमत्ता कर न भरल्याने पुणे महापालिकेने भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे. पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते निलेश राणेंची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे.
त्यामुळे पुणे महापालिकेने मालमत्ता कर न भरल्याने भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे. पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनूसार भाजप नेते निलेश राणेंची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मालमत्ता आहे.
या परिसरातील असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर राणेंनी न भरल्याने संबंधित मालमत्ता महापालिकेने सील केली आहे. भाजप नेते निलेश राणेंच्या मालमत्तेची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी आहे. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजची ही कारवाई केली आहे.