दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यासह राजकरणात खळबळ निर्माण केली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रया दिली आहे. ''मी आयुष्यात कधीही दिशा सालियान यांना भेटलेलो नाही. मी त्यांना ओळखतही नाही'', असं स्पष्टीकरण आदित्य आदित्य ठाकरेंनी दिलंय.
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असं सांगत राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
तसेच, कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं सततचं खोटं कॅम्पेन राबवने दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय.