आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी कोर्टात AI आणि डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गैरवापराविरोधात न्यायालयात धाव घेतलेली आहे. दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्या नावाने इंटरनेटवर पब्लिश होत असलेली अश्लील आणि AI च्या मदतीने तयार केलेल्या व्हिडिओंना हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.अशा प्रकारच्या कंटेंटमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असून, व्यक्तिमत्त्व अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे कंगना यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.
कंगना यांच्या वतीने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी ऑनलाइन पब्लिश होत असलेल्या अश्लील AI व्हिडिओ आणि स्टेटमेंटवर आळा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. कंगना यांच्या नावाने चुकीचे कंटेंट आणि माहिती इंटरनेटवर पसरवली जात असल्याचे त्यांच्या लीगल टीमने न्यायालयाला सांगितले.
अश्लील आणि बनावट कंटेंट हटवण्याची मागणी कंगना यांच्या वकिलांनी स्पष्ट केले की, 'सध्या न्यायालयाकडे आम्ही केवळ अश्लील आणि बनावट ऑनलाइन कंटेंट हटवण्याची मागणी केली आहे. कंगना यांच्याशी संबंधित मीम्स किंवा पोस्टविरोधात कोणत्याही आमच्या मागण्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक प्रकारच्या कंटेंटवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली नाही.
दिल्ली हायकोर्टाची विचारणा न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठाने कंगना यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, ज्यांच्या विरोधात हा अक्षेपार्ह कंटेंट हटवण्याचे आदेश मागितला आहे, त्या व्यक्ती कोण आहे? अशी विचारणा केली. तसेच, अभिनेत्रीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अंतरिम स्थगितीच्या अर्जाबाबतही खंडपीठाने नोटीस जारी केली. हा प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ३ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार आहे.