आपल्या भारतामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. अशा यातीलच एक लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी म्हणजे फ्लिपकार्ट. कंपनीला आया चांगलाच आर्थिक फटका बसलेला आहे. तो म्हणजे फ्लिपकार्टचे मूल्यांकन गेल्या दोन वर्षात 4 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 41 हजार कोटी रुपयांनी घसरलेले आहे. फ्लिपकार्ट मधील वॉलमार्टच्या इक्विटी सौरचनेतील बदलानुसार 31 जानेवारी 2022 रोजी आर्थिक वर्षात ई-कॉमर्स कंपनीचे मूल्यांकन हे 40 अब्जावरून 31 जानेवारी पर्यंत 35 अब्ज इतके कमी करण्यात आलेले आहे.
मूल्यांकन घसरण्याचे कारण
फ्लिपकार्टने त्यांच्या मूल्यांकन घसरण्याचे कारण फोनपे ही आर्थिक तंत्रज्ञान कंपनी असल्याचे सांगितले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टचे सध्याचे मूल्यांकन हे 30 ते 40 बिलियन दरम्यान आहे. वॉलमार्टने 2021 – 22 या आर्थिक वर्षात फ्लिपकार्टमधील 8 टक्के हिस्सा 3.2 अब्ज डॉलरला विकला होता. यानुसार या कंपनीचे मूल्यांकन 40 अब्ज इतके होते. 2023 – 24 मध्ये या कंपनीने 3.5 अब्ज देऊन कंपनीला आपला हिस्सा 10 टक्क्यांनी वाढवून 85 टक्के केला होता.
कंपनीचे दावे वास्तवाशी जुळत नाहीत
फ्लिपकार्टचे एंटरप्राइझ मूल्य35 अब्ज होते. परंतु फ्लिपकार्टने वॉलमार्टच्या अहवालानुसार मूल्यांकनात जी कपात झालेली आहे ती नाकारली आहे, कारण हे कंपनीच्या मूल्यांकनातील ‘वाजवी समायोजन’मुळे झाले आहे. फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हे स्पष्टीकरण चुकीचे आहे. PhonePe चे वेगळे करणे 2023 मध्ये पूर्ण झाले. यामुळे फ्लिपकार्टच्या मूल्यांकनात योग्य समायोजन करण्यात आले.
फ्लिपकार्टच्या सूत्रांनी सांगितले की या उपक्रमाचे मूल्यांकन शेवटचे 2021 मध्ये करण्यात आले होते आणि त्यावेळी फिनटेक फर्म PhonePe चे मूल्यांकन देखील ई-कॉमर्स कंपनीच्या एकूण मूल्यामध्ये समाविष्ट होते. जनरल अटलांटिक, टायगर ग्लोबल, रिबिट कॅपिटल आणि TVS कॅपिटल फंड इत्यादी गुंतवणूकदार गटांकडून 850 दशलक्ष उभारल्यानंतर PhonePe चे मूल्यांकन आता 12 बिलियनवर पोहोचले आहे.